मिशन नो सुसाईड -3 ( गोमटेश विद्यापीठ)

आज नियती फौंडेशनतर्फे येथील गोमटेश विद्यापीठमध्ये मराठी माध्यमातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'मिशन नो सुसाईड'या विषयावर सत्र घेण्यात आले.व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या नियती फौंडेशनच्या प्रमुख डॉ सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. गोमटेश हायस्कुलचे मुख्याध्यापक महेश कारेकर, गोमटेश विद्यापीठाचे ट्रस्टी श्री राजेश पाटील,डिग्री कॉलेज प्रिन्सिपॉल पाटील सर, प्रमुख वक्ते डॉ. भरत चौगुले, प्रो. शर्मिला संभाजी,सौ. मोनाली शाह,व सीमा सोलापूर व्यासपीठावर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणाले त्यानंतर मोनाली शाह यांनी पाहुणे व वक्त्यांची थोडक्यात ओळख करून दिली व उदघाटनपार भाषण दिले.

वक्ते डॉ. चौगुले यांनी सोशल मीडियाचा अतिरेक,त्याचा मुलांवर होणारा परिणाम तसेच मुलांनी त्याचा कितपत वापर करावा यावर योग्य मार्गदर्शन केले. प्रो. संभाजी यांनी मुलांना सकारात्मकता कशी जोपासावी,अपयश मिळाल्यास त्यावर मात करून यश मिळवावे,खचून जाऊन अयोग्य मार्ग निवडू नये तर आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात कामगिरी करावी,आपल्या पालकांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट त्याग कायम लक्षात घ्यावे,तर कधीच धीर खचनार नाही.असे मुलांना उत्तम प्रकारे समजावून सांगितले.

डॉ . सोनाली यांनी मुलाच्या शंकाचे निरसन केले,व कोणालाही काही मदत लागल्यास नियती फौंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाला नियती फौंडेशनचे डॉ. समीर सरनोबत,अमित देसुर कर,मीनल शाह,दीपा प्रभुदेसाई,रूप घाडी, प्रसाद कुलकर्णी,उपस्थित होते. सौ. भूमिका बाजीगर यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोमटेश शाळेच्या शिक्षिका सौ. सुषमा देसाई यांनी केले.