पालकांनी मुलांवर अपेक्षा लादु नये-स्वामी धर्मानंद

पालकांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत.मुलांची इच्छा,आवड काय आहे ते ध्यानात घेऊन त्याप्रमाणे त्यांना शिक्षण द्यावे असे विचार रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी धर्मानंद यांनी व्यक्त केले.नियती फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अपयशाने खचू नका,आत्मविश्वास बाळगा या विषयावर स्वामी धर्मानंद यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेत अपयश मिळाले म्हणून निराश होऊ नका.,अभ्यासात सातत्य ठेवा. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काहीतरी विशेष गुण असतो.त्याप्रमाणे पालकांनी आपल्या मुलाच्या अंगी असलेले गुण ओळखून त्याला प्रोत्साहन द्यावे असा सल्लाही स्वामी धर्मानंद यांनी दिला. स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रचंड उर्जा असते.त्या ऊर्जेचा वापर करून आपले आयुष्य यशस्वी बनवा असा संदेशही स्वामी धर्मानंद यांनी दिला.व्याख्याना नंतर पालक,विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची स्वामी धर्मानंद यांनी उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले.

या कार्यक्रमात मोटारसायकल वरून भूतानचा दौरा करून आलेले माधव आणि अमृता भिडे यांचाही स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ सोनाली सरनोबत यांनी स्वामीजींचा पुष्पगुच्छ ,शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. मोनाली शहा यांनी नियती फाउंडेशनचा परिचय करून दिला.भूमिका बाजीकर यांनी भिडेंच्या भूतान दौऱ्याची माहिती दिली.विलास अध्यापक यांनी स्वामी धर्मानंद यांचा परिचय करून दिला.डॉ. समीर सरनोबत यांनी आभार मानले.अमित देसुरकर यांनी सूत्रसंचालन केले.